#### Apple च्या एक वर्षाच्या मर्यादित वॉरंटीचा सारांश Apple किरकोळ खरेदीच्या मूळ दिनांकापासून एक वर्षापर्यंत समाविष्ट असलेली हार्डवेअर उत्पादने आणि अॅक्सेसरीज मटेरियलमधील आणि कारागिरीतील दोषांबाबत वॉरंटी प्रदान करते. Apple अपघात किंवा गैरवापरामुळे होणाऱ्या सामान्य झीज आणि नुकसानाची वॉरंटी देत नाही. सेवा प्राप्त करण्यासाठी, Apple ला कॉल करा किंवा Apple Store ला भेट द्या किंवा Apple च्या अधिकृत सेवा प्रदात्याला भेट द्या — उपलब्ध सेवा पर्याय हे ज्या देशामध्ये सेवा मागण्यात आलेली आहे त्यावर अवलंबून असतील आणि ते मूळ विक्रीच्या देशापुरते मर्यादित असू शकतात. स्थानानुसार कॉल शुल्क आणि आंतरराष्ट्रीय शिपिंग शुल्क लागू होऊ शकतात. [apple.com/legal/warranty](https://www.apple.com/legal/warranty/) आणि [support.apple.com/en-in](https://support.apple.com) येथे उपलब्ध सेवा प्राप्त करण्याबाबत पूर्ण अटी आणि तपशीलवार माहितीच्या अधीन राहून, तुम्ही वॉरंटी अंतर्गत वैध दावा सादर केलात, तर Apple त्यांच्या स्वेच्छानिर्णयांनुसार तुमचे हार्डवेअर डिव्हाइस दुरुस्त करेल, बदलून देईल किंवा त्याचा परतावा देईल. वॉरंटी लाभ हे स्थानिक ग्राहक कायद्याच्या अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या व्यतिरिक्त आहेत. या वॉरंटी अंतर्गत दावा दाखल करताना तुम्हाला खरेदी तपशीलांचा पुरावा प्रस्तुत करावा लागू शकतो. 011626-1 WAR-MT